कौस्तुभ सतीश कस्तुरे
जन्म: ८ एप्रिल १९९१, मुंबई
MMS in Information Technology
खाजगी कंपनीत व्यवस्थापकीय पदावर कार्यरत
कौस्तुभ कस्तुरे हे महाराष्ट्राच्या इतिहासावर पुस्तके लिहिणारे एक मराठी लेखक आणि इतिहास अभ्यासक आहेत. आजवर त्यांची दहा पुस्तके प्रकाशित झाली असून त्यातील आठ संशोधनपर ग्रंथ तर उर्वरित दोन कादंबऱ्या आहेत. संशोधनपर ग्रंथातील 'अंताजी माणकेश्वर गंधे' या ग्रंथाचे इंग्रजी आणि हिंदी अनुवादही प्रकाशित झाले आहेत. हे ग्रंथ असे:
कौस्तुभ हे मोडी जाणकार असून इतिहास संशोधन आणि जागरूकता यासाठी मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग आणि कार्यशाळांचे आयोजन करतात. मोडी लिपीच्या प्रचार आणि प्रसारादरम्यानच्या काळात त्यांनी मोडी लिपीचा फॉंट तयार करून तो सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिला, जो सदर संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल.
इ.स. २०१७ मध्ये ब्रिटिश लायब्ररी येथील छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना दिलेल्या चाफळ सनदेच्या फोटोझिंको प्रतीवर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने पुण्याच्या 'भारत इतिहास संशोधक मंडळ' येथे शोधनिबंध वाचन केले. इ.स. २०१८ सालच्या मंडळाच्या त्रैमासिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.
लिखाण आणि इतिहास संशोधनाव्यतिरिक्त कस्तुरे यांनी निरनिराळ्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये मराठ्यांच्या इतिहासातील निरनिराळ्या घटनांवर व्याख्याने आणि प्रेझेंटेशन्स दिली आहेत.